यमुनानगर - जगाधरी वर्कशॉपमध्ये कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी किट तयार करण्यात येत आहे. हे उत्तर रेल्वेचे असे पहिले वर्कशॉप आहे ज्यात तयार झालेले पीपीई किट भारतीय संरक्षण मंत्रालयात पास झाले आहे. याठिकाणी सध्या रोज मोठ्या प्रमाणावर किट तयार केले जात आहेत.
कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचे यश मिळवले आहे. जगाधरी वर्कशपने भारतीय रेल्वेत डॉक्टर आणि फ्रंट लाइन मेडिकल स्टाफद्वारा वापरले जाणारे कवरऑलचे नमूने तयार करुन भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठवले होते. जे पास झाले आहेत.
हस्तशिल्प केंद्राच्या इन्चार्ज मोनिका यांनी सांगितले, की या केंद्रात रोज मास्क आणि पीपीई किट तयार केले जात आहेत. याठिकाणी किट बनवणाऱ्या सर्व मुली आणि महिला या रेल्वे कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबातील आहेत. कोरोनासारख्या महामारीसोबत लढण्यासाठी संपूर्ण रेल्वे परिवार समोर आला आहे. भविष्यातही जितक्या प्रमाणात मास्क आणि किटची मागणी असेल, तितके आम्ही तयार करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.