भोपाळ- सिंगरौली जिल्ह्यातील सासन येथील रिलायन्स पॉवर प्लांटचे ऐश धरण फुटल्याने खळबळ उडाली आहे. धरण फुटल्याने जवळपाच्या खेड्यातल्या शेकडो घरांमध्ये धरणातील पाणी गेले. तर कंपनी जवळील हर्रहवा गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेत एक मृतदेह सापडा असून सहा पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत.
हेही वाचा- #लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. घटना घडताच एक मोठा आवाज झाला. त्यानंतर समजले की, धरण फुटले आहे. यापूर्वीही एनटीपीसीचे ऐश धरण फुटले होते.
धरणाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व या प्रकल्पाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, ते धरण कसे फुटले याबद्दल कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धरण पुन्हा एकदा फुटले आहे.