गाजियाबाद - राजाधानीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ नागरिकांना गाजियाबादमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या सहा जणांनी रुग्णालयातील नर्सची छेडछाड केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे सर्व जण नर्ससमोर अश्लील गाणे बोलत होते. तसेच नर्ससोबत छेडछाड केल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलीस करत आहेत. याची माहिती घेण्यासाठी एडीएम सिटी शैलेंद्र कुमार व एसपी मनीष मिश्रा हे रात्रीच रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, अशा घटनांनंतर उपचार कसा करायचा असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. या सहा रुग्णंपैकी एकामध्ये कोरोनाचे लक्षणं आढळली असून त्याचा अखेरची अहवाल येणे बाकी आहे.