बंगळुरू - सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच आता आंबा शेतकऱ्यांसमोर देखील आंबा निर्यातीचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आंबा विकास आणि विपणन महामंडळ (केएसएमडीएमसी) यांनी पोस्टाद्वारे आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक बॉक्समध्ये 2 डझन आंबे पॅक करून हे बॉक्स ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. यासंबंधी केएसएमडीएमसी चे व्यवस्थापक अधिकारी सी जी नागराज यांनी सांगितले की, आता आंबा फळपीक तयार झाले आहे. त्यामुळे यासंबंधी पोस्ट ऑफिसला संपर्क साधून हा आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यांनी देखील सहकार्य करण्यासाठी तयारी दाखवल्यामुळे 17 एप्रिल पासून हा आंबा पोष्टामार्फत पोहोचवण्याचे काम सुरू होणार आहे.
आंबच्या मागणीसाठी ग्राहक www.karsirimangoes.karnataka.gov.in या ऑनलाईन संकेस्थळावर भेट देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र नंतर कर्नाटक हा आंबा उत्पादन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे जवळपास 1.8 लाख हेक्टर क्षेत्रावर 100 जातींच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. येथे बदामी, सिंधुरी आणि रसपुरी या आंब्याच्या जातींना मोठी मागणी आहे.
लॉकडाऊनमुळे कर्नाटकात पोस्टाने घरपोच मिळणार आंबे
आंबेच्या मागणीसाठी ग्राहक www.karsirimangoes.karnataka.gov.in या ऑनलाईन संकेस्थळावर भेट देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.