ETV Bharat / bharat

कलम ३७० रद्द केल्याने भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, नौदलास हाय अलर्ट

पाकिस्तानी समर्थक भारतावर हल्ला करू शकतात अशी माहिती भारतीय नौदलाला मिळाली असून नौदलाने युद्धनौकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

author img

By

Published : Aug 9, 2019, 4:36 PM IST

कलम ३७० रद्द केल्याने दहशतवादी भारतावर हल्ला करण्याची शक्यता, नौदल हाय अलर्टवर

नवी दिल्ली - केंद्र सरकराने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. सरकारने उचललेल्या या पावलामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवादी भारतावर हल्ला करू शकतात, अशी माहिती भारतीय नौदलाला मिळाली असून नौदलाने युद्धनौकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

  • Sources: Indian Navy puts all its bases and warships on high alert. Measures taken after Article 370 was revoked by the government and also due to possibility of Pakistan-backed terrorists carrying out any attack

    — ANI (@ANI) August 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला होता. तर पाकिस्तानने भारतीय राजदूताला भारतात परतण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर पाकिस्ताने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याचा आणि द्विपक्षीय व्यापाराला स्थगिती देण्याचा निर्णयही घेतला आहे.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही भारताशी असलेले संबंध संपवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर टीका केली आहे. 'जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० विषयीचा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब आहे. यावर पाकने प्रतिक्रिया देण्याचा संबंधच येत नाही. पाकिस्तान जगासमोर विनाकारण कांगावा करून दाखवत आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.