नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राहुल गांधीच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने युवा नेत्याला अध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. या घडामोडींवर ईटीव्ही भारतने राजकीय विश्लेषक जैनब सिकंदर यांची प्रतिक्रीया जाणून घेतली.
जैनब म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाला प्रतिभावान आणि आक्रमक नेत्याची गरज आहे. जो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा मुकाबला करु शकेल. मोदी आणि शहा खुप चांगल्या पद्धतीने भाजप पक्षाचे काम करत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या तोडीसतोड नेत्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाकडे अध्यक्ष पदासाठी कोणी संभाव्य चेहरा आहे का? असे विचारले असता, सचिन पायलट यांना काँग्रेस अध्यक्षपद द्यायला हवे. पायलट यांची राजस्थान काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली होती तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाला वरती आणले होते. त्यामुळे त्यांना अध्यक्ष पद दिले पाहिजे. जैनब यांनी कमलनाथ, कॅप्टन अमरिंदर सिंग, अशोक गेलोहोत या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना 'ओल्ड गार्ड' असे म्हटले आहे.