जबलपुर - जगभरासह देशातही सध्या कोरोनाचा प्रसार वेगानै होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात आता पोलीस विभागातही कोरोनाची एन्ट्री झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जबलपूर येथील एका सीएसपी अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आयसीएमआर लॅबमधून शुक्रवारी दुपारी ७७ नमुण्यांची चाचणी केली असता यामध्ये ३ जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये या सीएसपी अधिकाऱ्याच्या नावाचा समावेश आहे. ते इतरही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे इतरांचीही लवकरच चाचणी केली जाणार आहे.
दरहाई सराफा येथे देखील ७३ वर्षीय एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती सराफा व्यापाराशी संबधीत आहे. तर, काहीच दिवसांपूर्वी भोपाळवरुन परतलेल्या एका २२ वर्षीय व्यक्तीच्या देखील कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्याला पाटण येथे क्वारंटाईन करुन ठेवल्यामुळे त्याच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही.
शनिवारी दुपारी ७७ चाचण्यांपैकी १७ नमुण्यांची चाचणी सुरू आहे. बाकीचे नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. जबलपूर येथे आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३४ झाली आहे. यापैकी ७ जण बरे झाले आहेत.