नवी दिल्ली - सीएए, एनआरसी कायद्यावरून देशभरात भाजप सरकारविरोधात टीका केली जात असताना दिल्लीत प्रकाशीत करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे आहे.
-
आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी - नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda pic.twitter.com/VVCTQKdYFS
— Jai Bhagwan Goyal (@JaiBhagwanGoyal) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी - नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda pic.twitter.com/VVCTQKdYFS
— Jai Bhagwan Goyal (@JaiBhagwanGoyal) January 11, 2020आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी - नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda pic.twitter.com/VVCTQKdYFS
— Jai Bhagwan Goyal (@JaiBhagwanGoyal) January 11, 2020
जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून त्यांनी ट्विट करून पुस्तकप्रकाशीत केल्याची माहिती दिली आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी 'धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'पुस्तक प्रकाशीत करण्यात आले, अशा आशयाचे ट्विट गोयल यांनी केले आहे. मात्र, भाजप पक्षाशी संबंधित कोणत्याही ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिलेली नाही.
-
प्रदेश भाजपा कार्यालय में धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन का आयोजन किया गया। pic.twitter.com/e6QovOAdmN
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">प्रदेश भाजपा कार्यालय में धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन का आयोजन किया गया। pic.twitter.com/e6QovOAdmN
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 11, 2020प्रदेश भाजपा कार्यालय में धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन का आयोजन किया गया। pic.twitter.com/e6QovOAdmN
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 11, 2020
या कार्यक्रमाला भाजपचे दिल्ली प्रदेश प्रभारी शाम जाजू, माजी खासदार महेश गिरी यांच्या भाजप नेते उपस्थित होते. या पुस्तकाद्वारे नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कार्यक्रम पार पडल्याची माहिती दिली आहे. मात्र, या पुस्तकाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.