नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला पत्र लिहले असून एनडीएला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रात त्यांनी एनडीएद्वारा केलेल्या कामांचा उल्लेख केला.
मोदींकडून जोरदार प्रचार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी राज्यात 12 प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नीतीश कुमारांसह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते या सभात सहभागी झाले होते. सासाराम, गया, भागलपूर, दरभंगा, मुजफ्फरपूर, पाटणा, छपरा, पूर्व चंपारण,समस्तीपूर, पश्चिम चंपारण, सहरसा, अररियाच्या फरबिसगंज येथे सभांना संबोधित केले.
तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान -
बिहारमध्ये 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 28 नोव्हेंबरला 71 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झाले. याबरोबरच शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात मतदान होईल. या निवडणुकीत, राजद हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.