ETV Bharat / bharat

हरियाणा विधानसभा : राज्यात आज पंतप्रधान मोदींच्या दोन सभांचे आयोजन

हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यामध्ये मोदींच्या चार जंगी सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 15, 2019, 10:30 AM IST

चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यामध्ये मोदींच्या चार जंगी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील दोन सभा आज राज्यातील चारखाई दादरी आणि कुरुक्षेत्र येथे होणार आहेत. तर शेवटची सभा हिसार येथील जाट बहुल भागामध्ये १८ ऑक्टोबरला होणार आहे.

वल्लभगड येथे झालेल्या पहिल्या सभेप्रमाणेच या सभेतही मोदी मनोहरलाल खट्टर सरकारने केलेल्या कामांची लोकांना आठवण करुन देण्याची शक्यता आहे. तसेच कलम ३७० रद्द केल्याचा पुनररुच्चार करण्याची शक्यता आहे. वल्लभगड येथील रॅली तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्यावरुन त्यांनी काँग्रेसवर हल्ला केला होता.

भाजपने 'म्हारो सपनो का हरियाणा' म्हणजेच माझ्या स्वप्नातील हरियाणा या नावाने निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये हरियाणा स्टार्टअप मिशन, युवा विकास आणि रोजगार मंत्रालयाची स्थापना, राज्यासाठी एक ऑल इंडिया मेडिकल इस्टिट्यूट(एम्स) आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने दिले आहे.

हरियाणामध्ये राज्य विधानसभेची निवडणुक २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Intro:Body:

national marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.