ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाराणसी दौरा, पाहा दिवसभराचा कार्यक्रम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीला आज भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी 2 वाजून 10 मिनिटांनी वाराणसीमध्ये पोहचतील. रात्री 8 वाजून 50 मिनिटांपर्यंत मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतील. तर रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी मोदी दिल्लीसाठी रवाना होतील. जवळपास 6 तास मोदी वाराणसीमध्ये असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Nov 30, 2020, 1:33 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीला आज भेट देणार आहेत. वाराणसीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. 84 घाटांवर 15 लाख दिवे लावण्यात येणार आहेत. आज दुपारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान विशेष विमानाने वाराणसी विमानतळावर पोहचतील. कोरोना काळातील मोदींचा हा पहिला वाराणसी दौरा आहे. उत्तर प्रदेश सरकारने पत्रक जारी करून मोदींच्या या दौऱ्याची माहिती दिली. यावेळी मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथही असतील. मोदी देवदिवाळी महोत्सवातही सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 वाजून 10 मिनिटांनी वाराणसीमध्ये पोहचतील. रात्री 8 वाजून 50 मिनिटांपर्यंत मोदी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतील. तर रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी मोदी दिल्लीसाठी रवाना होतील. जवळपास 6 तास मोदी वाराणसीमध्ये असणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा...

दिवसभराचा कार्यक्रम -

खजुरी येथे पोहोचल्यानंतर मोदी वाराणसी अलाहाबाद सहापदरी मार्गाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते एका सभेला संबोधित करतील. या सभेत जवळपास 5 हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर मोदी हेलिकॉप्टरने डोमरी गावात पोहचतील. तेथील विश्वनाथ कॉरिडॉरची पाहणी करतील. त्यानंतर राजघाटवर पोहचून पहिले 5 दिवे लावतील. याचबरोबर संत रवीदास घाटावर संत रवीदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतील. तेथून ते सारनाथला भेट देतील. तिथे 45 मिनिटे थांबल्यानंतर मोदी दिल्लीकडे रवाना होतील.

मोदींसाठी विशेष भेट -

पंतप्रधान सारनाथला भेट देणार आहेत. गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश याच ठिकाणी दिला होता. बनारसमधील बच्चे लाल मौर्या या वीणकराने गौतम बुद्ध यांचा उपदेश असलेले वस्त्र मोदींना भेट म्हणून देण्यासाठी खास तयार केले आहे. त्यावर 'बुद्धम् शरणम् गच्छामि', असे लिहिलेले आहे. तसेच वस्त्रावर बोधी वृक्षाचे पानही आहे. गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली 'बौद्धत्व' प्राप्त झाले होते. म्हणून त्या वृक्षाला 'बोधी वृक्ष' असे म्हणतात. बौद्ध धर्मात प्रचलित रंगांचा वापर करून मेहरूण रंगाच्या कपड्यावर पिवळ्या रेशीम धाग्याने बोधी वृक्षाचे पान आणि बुद्धम् शरणम् गच्छमिचा संदेश लिहिला आहे.

हेही वाचा - कोरोना लस विकसित करणाऱ्या तीन टीमसोबत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे साधणार संवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.