नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राचे अनावरण केले. तसेच, त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नाव बदलून लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे-पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असे केले.
डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी अनेक वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 'देह वेचावा कारणी' असे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. 'एखाद्या व्यक्तीचे आयुष्य एका महान हेतूसाठी समर्पित करणे' असा याचा अर्थ आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेती आणि सहकार यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्याच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेश : तीन दलित बहिणींवर अॅसिड हल्ला; कारण अस्पष्ट
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना 1964 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे करण्यात आली. ग्रामीण जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि मुली सक्षम व्हाव्यात, हा याचा मुख्य उद्देश होता. ही संस्था सध्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि मानसिक विकासाचे मुख्य कार्य करीत आहे.
'डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राचे अनावरण आज झाले. परंतु त्यांच्या जीवनातील कथा महाराष्ट्रातील प्रत्येक भागात सापडतील. बाळासाहेब विखे-पाटील कसे होते ते मीही पाहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. ज्यांनी मला या कार्यक्रमास सामील होण्यासाठी आमंत्रित केले, त्या राधाकृष्ण विखे-पाटील, त्यांचे कुटुंबीय आणि अहमदनगरमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे,' असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमास संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.
'समाजात अर्थपूर्ण परिवर्तनाचे राजकारण कसे करावे, गाव व गरिबांचे प्रश्न कसे सोडवावेत, यावर विखे-पाटील यांनी नेहमीच भर दिला. यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे बनले,' असे मोदी पुढे म्हणाले. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - मेट्रोच्या नव्या कारशेडला एकही रुपया खर्च नाही, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती