नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'पाकिस्तान राष्ट्रीय दिवसा'निमित्त भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शुभेच्छा संदेश मिळाला. मोदींनी पाकिस्तानी जनतेला शभेच्छा दिल्या, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे. 'मी पाकिस्तान राष्ट्रीय दिवसानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. येथील लोकांनी दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणासाठी आणि प्रादेशिक शांतता व समृद्धीसाठी एकजुटीने काम केले पाहिजे,' असा संदेश मोदींनी दिल्या असा दावा खान यांनी केला आहे.
Received msg from PM Modi: "I extend my greetings & best wishes to the people of Pakistan on the National Day of Pakistan. It is time that ppl of Sub-continent work together for a democratic, peaceful, progressive & prosperous region, in an atmosphere free of terror and violence"
— Imran Khan (@ImranKhanPTI) March 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Received msg from PM Modi: "I extend my greetings & best wishes to the people of Pakistan on the National Day of Pakistan. It is time that ppl of Sub-continent work together for a democratic, peaceful, progressive & prosperous region, in an atmosphere free of terror and violence"
— Imran Khan (@ImranKhanPTI) March 22, 2019Received msg from PM Modi: "I extend my greetings & best wishes to the people of Pakistan on the National Day of Pakistan. It is time that ppl of Sub-continent work together for a democratic, peaceful, progressive & prosperous region, in an atmosphere free of terror and violence"
— Imran Khan (@ImranKhanPTI) March 22, 2019
सध्या भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यासंघटनांवर कारवाई केली जात आहे. या संघटना कडक कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, भारत सरकारने पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याविषयी बजावले आहे. पाकिस्तान नॅशनल डेच्या कार्यक्रमासाठी जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांना बोलावण्यात आल्याने भारताने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमात एकही भारतीय प्रतिनिधी सहभागी झालेला नाही. अशा परिस्थितीत इम्रान खान यांचे हे वक्तव्य समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून अशा कार्यक्रमांमध्ये भारतीय केंद्रीय मंत्री प्रतिनिधीत्व करत असत. मात्र, या वेळच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत पाकिस्तानचा फुटीरतावाद्यांना आमंत्रित करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे. 'भारताने आज होणाऱ्या पाकिस्तान राष्ट्रीय दिवस समारंभात एकाही प्रतिनिधीला पाठविण्यात आले नसल्याची माहिती दिली. पाकिस्तानी उच्चायोगाने हुर्रियत कॉन्फरन्सच्या प्रतिनिधींना समारंभासाठी आमंत्रित केले. यानंतर भारताकडून हा निर्णय घेण्यात आला,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. लाहोर करारानिमित्त दर वर्षी २३ मार्चला पाकिस्तानात हा दिवस साजरा केला जातो.