ETV Bharat / bharat

'देशातील युवकांना अराजकता आणि अव्यवस्थेविरूद्ध चीड'

author img

By

Published : Dec 29, 2019, 12:43 PM IST

युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे - मोदी

modi
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी यावर्षी अखेरच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला. युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यांना घराणेशाही आणि जातीवाद पसंत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • PM Modi in #MannKiBaat: In the coming decade, young India will play a key role. Today's youth believes in the system and also has an opinion on a wide range of issues. I consider this to be a great thing. What today's youth dislikes is instability, chaos, nepotism. pic.twitter.com/NPKp9ASvO3

    — ANI (@ANI) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

PM Modi in #MannKiBaat: In the coming decade, young India will play a key role. Today's youth believes in the system and also has an opinion on a wide range of issues. I consider this to be a great thing. What today's youth dislikes is instability, chaos, nepotism. pic.twitter.com/NPKp9ASvO3

— ANI (@ANI) December 29, 2019 ">
आजची पिढी अतिशय चपळ आहे. युवक व्यवस्थेला मानणारा आहे. काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचा विचार आजच्या युवकांच्या मनात असतो. वेगवेगळ्या विषयांवर त्याला स्व:तची मते आहेत. येणाऱ्या दशकामध्ये नवी पिढी राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वाचा हिस्सा घेणार आहे, हे निश्चित्त असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले. तरुणपणाचा काळ हा सर्वात जास्त मौल्यवान असतो. युवा अवस्थेचा तुम्ही कसा वापर करता यावर तुमचे जीवन अवलंबून असते, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाचा उल्लेख केला. आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असतो. मात्र विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपल्याला जुन्या मित्रांना भेटायला येते. अशा कार्यक्रमांमध्ये जर विद्यार्थ्यांनी एखादा संकल्प केला तर यामध्ये आणखी रंग भरेल, असे मोदी म्हणाले.

मोदींनी बोलताना स्वदेशी वस्तू खरेदीवर भर दिला. सर्वांनी स्थानिक वस्तू खरेदीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या तरुणांना कौशल्य देणाऱ्या 'हिमाकत' उपक्रमाचे मोदींनी कौतूक केले. या उपक्रमाद्वारे १८ हजार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. तर ५ हजार युवकांना रोजगारही मिळाला आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेने मागील ६ महिन्यात खूप काम केले आहे. कामाच्या बाबतीत संसदेने मागील ६० वर्षांचा विक्रम मोडला आहे. १७ व्या लोकसभेत मागील सहा महिन्यात संदस्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याचे मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी यावर्षी अखेरच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला. युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यांना घराणेशाही आणि जातीवाद पसंत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • PM Modi in #MannKiBaat: In the coming decade, young India will play a key role. Today's youth believes in the system and also has an opinion on a wide range of issues. I consider this to be a great thing. What today's youth dislikes is instability, chaos, nepotism. pic.twitter.com/NPKp9ASvO3

    — ANI (@ANI) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आजची पिढी अतिशय चपळ आहे. युवक व्यवस्थेला मानणारा आहे. काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचा विचार आजच्या युवकांच्या मनात असतो. वेगवेगळ्या विषयांवर त्याला स्व:तची मते आहेत. येणाऱ्या दशकामध्ये नवी पिढी राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वाचा हिस्सा घेणार आहे, हे निश्चित्त असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले. तरुणपणाचा काळ हा सर्वात जास्त मौल्यवान असतो. युवा अवस्थेचा तुम्ही कसा वापर करता यावर तुमचे जीवन अवलंबून असते, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाचा उल्लेख केला. आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असतो. मात्र विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपल्याला जुन्या मित्रांना भेटायला येते. अशा कार्यक्रमांमध्ये जर विद्यार्थ्यांनी एखादा संकल्प केला तर यामध्ये आणखी रंग भरेल, असे मोदी म्हणाले.

मोदींनी बोलताना स्वदेशी वस्तू खरेदीवर भर दिला. सर्वांनी स्थानिक वस्तू खरेदीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या तरुणांना कौशल्य देणाऱ्या 'हिमाकत' उपक्रमाचे मोदींनी कौतूक केले. या उपक्रमाद्वारे १८ हजार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. तर ५ हजार युवकांना रोजगारही मिळाला आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेने मागील ६ महिन्यात खूप काम केले आहे. कामाच्या बाबतीत संसदेने मागील ६० वर्षांचा विक्रम मोडला आहे. १७ व्या लोकसभेत मागील सहा महिन्यात संदस्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याचे मोदी म्हणाले.

Intro:Body:

'देशातील युवकांना अराजकता आणि अव्यवस्थेविरूद्ध चिड'

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी यावर्षी अखेरच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला. युवकांना जातीयवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढ जाऊन विचार करत आहे. त्यांना परिवारवाद  आणि जातीवाद पसंद नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.   

आजची पिढी अतिशय चपळ आहे.  युवक व्यवस्थेला माननारा आहे. काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचा विचार आजच्या युवकांच्या मनात असतो. वेगवेगळ्या विषयांवर त्याला स्वत:ची मते आहेत. येणाऱया दशकामध्ये नवी पिढी राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वाचा हिस्सा घेणार आहे, हे निश्चित्त असल्याचे मोदी म्हणाले.  

पंतप्रधान मोदींनी यावेळी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले. तरुणपणाचा काळ हा सर्वात जास्त मौल्यवान असतो. युवा अवस्थेचा तुम्ही कसा वापर करता यावर तुमचे जीवन अवलंबून असते, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाचा उल्लेख केला. आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असतो. मात्र विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपल्याला जुन्या मित्रांना भेटायला येते. अशा कार्यक्रमांमध्ये जर विद्यार्थ्यांनी एखादा संकल्प केला तर यामध्ये आणखी रंग भरेल, असे मोदी म्हणाले.

मोदींनी बोलताना स्वदेशी वस्तू खरेदीवर भर दिला. सर्वांनी स्थानिक वस्तू खरेदीवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीच्या तरुणांना कौशल्य देणाऱ्या 'हिमाकत' उपक्रमाचे मोदींनी कौतूक केले. या उपक्रमाद्वारे १८ हजार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. तर ५ हजार युवकांना रोजगारही मिळाला  आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेने मागील ६ महिन्यात खूप काम केले आहे.  कामाच्या बाबतीत संसदेने मागील ६० वर्षांचा विक्रम मोडला आहे. १७ व्या लोकसभेत मागील सहा महिन्यात संदस्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याचे मोदी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.