ETV Bharat / bharat

देशात परकीय गुंतवणुकीत वाढ; पंतप्रधानांनी 'मेक फॉर वर्ल्ड'ची केली घोषणा - पंतप्रधान मोदींचे भाषण

आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारत करण्यावर भर दिला. यावेळी ते म्हणाले, किती काळ देशातील कच्चा माल आपण इतर देशांना पाठवणार, आपण आत्मनिर्भर बनून स्वतःचे उत्पादन करायला हवे.

pm modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 15, 2020, 8:27 AM IST

Updated : Aug 15, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - आज देशभरात ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी देशवासियांना संबोधित करताना त्यांनी कोरोना योद्धांना नमन केले. कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी सेवा परमो धर्म मानून २४ तास काम करत आहेत. तसेच आजचा दिवस हा आपल्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा आणि महापुरुषांचा असल्याचा ते म्हणाले.

आज देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारत करण्यावर भर दिला. यावेळी ते म्हणाले, किती काळ देशातील कच्चा माल आपण इतर देशांना पाठवणार, आपण आत्मनिर्भर बनून स्वतःचे उत्पादन करायला हवे.

आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी अनेक अडचणी आहेत. मात्र, आपण पुढाकार घेऊन प्रयत्न केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असेदेखील मोदी यावेळी म्हणाले. पीपीई कीट, एन-९५ मास्क, व्हेंटीलेटर्सचे उत्पादन भारतात होत नव्हते. सुरुवातीला हे सर्व आपण इतर देशांतून आयात करत होतो. मात्र, आता या सर्व वस्तूंचे उत्पादन आपल्या देशात होत असून आपण त्याची निर्यात करायला सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी आपल्या देशात थेट परकीय गुंतवणूकीत (एफडीआय) 18 टक्के वाढ झाली होती. आम्ही लोकशाही आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या पाया मजबूत करण्यासाठी धोरणे राबवली आहे, त्यामुळे जगाने भारतावर विश्वास दाखविला आहे, त्यामुळे मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत, असे मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या देशात 1,300 हून अधिक बेटे आहेत. त्यांचे भौगोलिक स्थान आणि देशाच्या विकासासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन यापैकी काही बेटांवर नवीन प्रकल्प सुरू करण्याचे काम सुरू आहे, असे मोदींनी सांगितले. तसेच एलओसी ते एलएसीपर्यंत कोणीही आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही. कोणीही देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या सैनिकांनी योग्य प्रत्युत्तर दिले. दहशतवाद आणि विस्तारवादाशी भारत ठामपणे मुकाबला करत असल्याचे मोदींनी सांगितले. आपल्या शेजारील राज्ये आपल्याशी केवळ सीमा सामायिक करतात, असे नाही. तर त्यांच्यांशी आपला सुसंवाद असून गेल्या काही वर्षात शेजारील देशांशी आपले संबंध आणखी मजबूत केले आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांबद्दल त्यांनी माहिती दिली. भारतात सध्या तीन लसींची मानवी चाचणी सुरू आहे. शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदील मिळताच देशात लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आधुनिक, नवीन आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणून, आम्ही तीन दशकांनंतर नवीन शिक्षण धोरण आणले आहे, असे मोदी म्हणाले.

Last Updated : Aug 15, 2020, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.