ETV Bharat / bharat

आयुर्वेदिक पद्धतीने कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार ; टास्क फोर्सची स्थापना - कोरोना

भारत सरकारने आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांवर उपचार करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे.

PM Modi sets up task force fPM Modi sets up task force f
PM Modi sets up task force f
author img

By

Published : Apr 12, 2020, 2:17 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनावर उपचार शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे. भारत सरकारने आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांवर उपचार करण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक टास्क फोर्स तयार केल्याचे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

  • PM has set up a task force for scientific validation of Ayurveda&traditional medicine formulas through research institutions like ICMR,for use in treatment of #COVID19. We received 2000 proposals, of which many will be sent to ICMR&others,after screening: Shripad Y Naik,MoS AYUSH pic.twitter.com/YQG91aqC0z

    — ANI (@ANI) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयसीएमआरसारख्या संशोधन संस्थांमार्फत आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांवर वैज्ञानिक मान्यतेसाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स आयुर्वेदात कोरोनावर उपचार करण्यासाठी कार्य करेल. याप्रकरणी आम्हाला 2 हजार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, त्यातील काहींचे वैज्ञानिक वैधतेचे मूल्यांकन करून आयएमसीआरला पाठविण्यात आले आहेत, असे नाईक यांनी सांगितले.

आयुर्वेदासारख्या प्राचीन वैद्यकीय यंत्रणेचा वापर कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो असे, नाईक यापूर्वी देखील म्हणाले होते. आयुष मंत्रालयाने याच वर्षी 29 जानेवारी रोजी एक प्रेस नोट जारी केली होती. त्यात कोरोना विषाणूंच्या लक्षणांवर उपचारासाठी होमियोपॅथीमध्ये औषध असल्याचं म्हटलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.