ETV Bharat / bharat

स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान मोदी 'ग्लोबल गोलकिपर' पुरस्काराने सन्मानित - पंतप्रधान मोदी गोलकिपर अवार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्लोबल गोलकिपर
author img

By

Published : Sep 25, 2019, 9:48 AM IST

न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवल्यामुळे त्यांना या पुरस्कारामे सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार देण्यात आला.

  • New York: Prime Minister Narendra Modi receives 'Global Goalkeeper Award' for the 'Swachh Bharat Abhiyan', from the Bill and Melinda Gates Foundation. Award presented by Bill Gates. pic.twitter.com/Ty1vn92ADg

    — ANI (@ANI) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ज्या लोकांनी स्वच्छ भारत अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच भारत पाणी वाचवण्यासाठी जलजिवन अभियान, फिट इंडिया अभियानावरही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या उद्दिष्टांच्या जवळ जात आहोत, असे मोदी म्हणाले.

मोदी सरकारने २०१४ साली स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाद्वारे देशामध्ये स्वच्छतेसंदर्भात मोठं काम करण्यात आलं. देशामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक शौचालये मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आली. तसेच घन कचऱ्याचे व्यवस्थपानही व्यवस्थितपणे करण्यात आले. त्यामुळे मोदींना पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले.

गेटस् फाउंडेशनद्वारे दरवर्षी 'ग्लोबल गोलकिपर अवार्ड' देण्यात येतो. 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल' साध्य करण्यासाठी केलेल्या कामांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

स्वच्छ भारत अभियानापूर्वी देशामध्ये ५० कोटी लोकांकडे शौचालय नव्हती. मात्र, आता बहुसंख्य लोकांकडे शौचालये आहेत. स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये भारताला अजून खूप काम करायचे आहे. मात्र, स्वच्छ भारत मिशनमुळे देशामध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे बिल गेटस् फाउंडेशनने म्हटले आहे.

भारतामध्ये राबवण्यात आलेले स्वच्छता अभियान जगामध्ये नमुना म्हणून राबता येऊ शकते. गरिबांच्या जिवनामध्ये स्वच्छता वाढण्यास त्यामुळे मदत होईल, असे फाउंडेशनने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.