अकोला - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी मोदी अकोल्यामध्ये सभा घेत आहेत.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी पाणी पोहचणार
- संघटन हेच शक्तीचे सुत्र, ग्रामराज्य निर्माण करी - तुकडोजी महाराजांचे शब्द आजही प्रेरणा देत आहेत
- ५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा केला
- काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीनं महाराष्ट्राचं नुकसान - मोदी
- २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार
- पहिले विदर्भाच्या नावाने पॅकेज घोषीत व्हायचे, पण ते लोकांपर्यंत पोहचत नव्हते
- महाराष्ट्रातील नेत्यांना माहित होतं एक दिवस आपल पितळं उघड पडेल, विरोधकांवर मोदींची टीका
- राज्यात मजबूत सरकार बनवण्यासाठी मतदान करा
- काँग्रेस राष्ट्रवादीन कायमच वीर सावरकरांचा अपमान केला
- विरोधकांना दुभंगलेला देश हवा आहे.
- सबका साथ सबका विश्वास हेच आमचे ध्येय
- जम्मू काश्मीर आणि तेथील लोक भारताचे संतान
- दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्व देश काश्मीरबरोबर आहे
- महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा नाही. जेथील जवानाने काश्मीरसाठी बलिदान दिले नाही.