ETV Bharat / bharat

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : मृतांचा आकडा वाढून २०७वर पोहोचला; ३ भारतीयांचा समावेश - president ramnath kovind

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

पंतप्रधान, राष्ट्रपतीकडून श्रीलंकेतील हल्ल्याचा निषेध
author img

By

Published : Apr 21, 2019, 3:57 PM IST

Updated : Apr 21, 2019, 10:59 PM IST

नवी दिल्ली - कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटामध्ये मृतांचा आकडा वाढून २०७ वर पोहेचला आहे. या मृतांमध्ये ३ भारतीयांचा समावेश असल्याचे श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने सांगितले आहे. तर, कोणत्याही प्रकराचे मानवीय सहाय्य करण्याची तयारी भारताने दर्शवली आहे.

श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. या घटनेचा भारताने निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तेथील दूतावसातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत काही भारतीयांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या बद्दल संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

श्रीलंकेच्या कोलंबो आणि इतर काही भागांत साखळी बॉम्बस्फोट झाले. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या कठीण प्रसंगी भारत श्रीलंकेसोबत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी मृतांविषयी शोक व्यक्त केला आहे.

  • श्रीलंका में हुए आतंकवादी हमले की भारत कड़ी निंदा करता है और श्रीलंका के लोगों तथा सरकार को अपनी संवेदना प्रेषित करता है। निर्दोष लोगों के साथ की गई ऐसी क्रूर हिंसा का, सभ्य समाज में कोई स्थान नहीं है। हम, संकट की इस घड़ी में पूरी दृढ़ता से श्रीलंका के साथ हैं —राष्ट्रपति कोविन्द

    — President of India (@rashtrapatibhvn) April 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्याविषयी शोक व्यक्त केला. त्यांनी श्रीलंकेच्या जनतेसोबत असल्याचे सांगितले. निरपराध लोकांना लक्ष्य करून करण्यात येणाऱ्या हिंसेला समाजात जागा नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

  • Indians in distress may please contact Indian High Commission in Colombo. We will provide you all assistance. @IndiainSL Our helpline numbers are :
    +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789.
    Pls RT

    — Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. कोलम्बोतील भारतीय उच्चायुक्तालयाने काही हेल्पलाईन क्रमांक भारतीय नागरिकांसाठी जारी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
हे क्रमांक पुढीलप्रमाणे - +९४७७७९०३०८२, +९४११२४२२७८८, +९४११२४२२७८९, +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६

कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 21, 2019, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.