नवी दिल्ली - राज्यसभेचे २५० वे अधिवेशन आज होते आहे. यानिमित्ताने संसदेत बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या जडणघडणीत राज्यसभेचा वाटा मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या हितासोबतच श्रेत्रीय हित जपले जाणेही आवश्यक आहे. या दोन्हीमधील संतुलन राखले जाण्याचे काम हे या सभागृहात होते असे ते म्हणले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, की राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालण्यामागे सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. या सभागृहात विचार विनिमय, वाद विवाद होणे गरजेचे आहे. मात्र या सर्वाच्या माध्यमातून चर्चा होणे गरजेचे आहे. यावेळी मला दोन पक्षांचा उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे एनसीपी आणि बीजेडी.
या दोन पक्षांनी स्वतःला शिस्त लाऊन घेतली आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी नियम केला आहे, की आम्ही काहीही झाले तरी 'वेल'मध्ये उतरणार नाही. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकदाही त्यांनी या नियमाचे उल्लंघन केले नाही. शांतपणे, मुद्देसूदपणे आपले विचार आणि संकल्पना त्यांनी या सभागृहामध्ये मांडल्या आहेत. शिवाय, तसे करूनही आतापर्यंत त्यांच्या विकासकामांमध्ये कोणताही अडथळा आला नाही.
त्यांच्या या शिस्तीचे इतर पक्षांनी, आणि अगदी माझ्याही पक्षाने अनुकरण केले पाहिजे. राज्यसभेचे २५० वे अधिवेशन सुरु आहे. तेव्हा अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला जाणे आवश्यक आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.
हेही वाचा : नागपूरचे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शपथविधी पूर्ण