ETV Bharat / bharat

कोरोना वॉरिअर्संना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोना विषाणू (साथीचा रोग) विरूद्ध लढणार्‍या डॉक्टरांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारने 1991 ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो.

author img

By

Published : Jul 1, 2020, 12:49 PM IST

Updated : Jul 1, 2020, 1:04 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोना विषाणू (साथीचा रोग) विरूद्ध लढणार्‍या डॉक्टरांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच डॉक्टर स्वत: ला धोक्यात घालून जीव वाचवत आहेत, असे मोदी म्हणाले. मोदींनी राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊंटंट दिनानिमित्तही देशभरातील सीए (चार्टर्ड अकाऊंटंट ) यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संकटकाळात अग्रभागी राहून कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टारांना सलाम, असे टि्वट मोदींनी केले आहे. नुकत्याच झालेल्या भाषणातील एका छोट्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते, की आई बाळाला जन्म देते. तर डॉक्टर पुनर्जन्म देतात.

राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दरवर्षी 1 जुलैला साजरा करण्यात येतो. आपल्या अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि नावाजलेले डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन करण्यात येते.

केंद्र सरकारने 1991 ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन असतो. तर, अमेरिकेत 30 मार्च, क्युबामध्ये 3 डिसेंबर आणि इराणमध्ये 23 ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो.

Last Updated : Jul 1, 2020, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.