धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धुळ्यात आगमन झाले आहे. यावेळी मोदींनी अक्कलपाडा धरण, भुसावळ बांद्रा रेल्वेसह अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
- देशवासीयांच्या प्रत्येक अश्रूंचा बदला घेतला जाईल - मोदी
- खान्देशच्या अहिराणी भाषेतून मोदींनी केली भाषणाला सुरुवात
- जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे मोदींनी केले उदघाटन
- धुळे नरडाना रेल्वेमार्गाचेही मोदींकडून उद्घाटन
- सुलवाडे जामफल सिंचन योजनेचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण
- भुसावळ बांद्रा रेल्वेचेही मोदींनी केले उद्घाटन
- मोदींनी रिमोटचे बटन दाबून केले अक्कलपाडा धरणाचे लोकार्पण
- एकनाथ खडसेंची व्यासपीठावर उपस्थिती
- फडणवीस यांनी आपल्या भाषणातून वगळले एकनाथ खडसेंचे नाव
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थित
- पंतप्रधान मोदींचे व्यासपीठावर आगमन