ETV Bharat / bharat

'शेजारधर्म जपण्याच्या भारताच्या धोरणात बांगलादेशाचे स्थान म्हत्त्वपूर्ण' - बांगलादेश भारत द्विपक्षीय संबंध

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल बैठक घेतली. बांगलादेशासोबत असलेले संबंध कायम ठेवणे ही भारताची प्राथमिकता असून शेजारधर्म जपण्याच्या भारताच्या धोरणात बांगलादेशाचे स्थान म्हत्त्वपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले. तर भारताने 1971 पासून बांगलादेशाला पाठिंबा दर्शवला आहे. भारत हा बांगलादेशाचा खरा मित्र आहे, असे हसिना म्हणाल्या.

हसिना-मोदी
हसिना-मोदी
author img

By

Published : Dec 17, 2020, 5:43 PM IST

नवी दिल्ली - बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल बैठक घेतली. यावेळी भारत आणि बांगलादेशादरम्यान अनेक करारांवर स्वाक्षरी झाली. विजय दिवसानंतर आजची बैठक महत्त्वपूर्ण आहे. बांगलादेशासोबत असलेले संबंध कायम ठेवणे ही भारताची प्राथमिकता असून शेजारधर्म जपण्याच्या भारताच्या धोरणात बांगलादेशाचे स्थान म्हत्त्वपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले.

कोरोना महामारीमुळे हे वर्ष संघर्षपूर्ण होतं. या संकटाच्या काळातही भारत आणि बांगलादेश दरम्यानचे परस्पर सहकार्य उत्तम राहिले. औषधे, वैद्यकीय सामग्री अशा अनेक बाबींवर दोन्ही देशांनी एकमेंकाना सहकार्य केलं. कोरोनावर लस निर्माण झाल्यानंतरही दोन्ही देशांदरम्यानचे सहकार्य असेच कायम राहिल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तर भारताने 1971 पासून बांगलादेशाला पाठिंबा दर्शवला आहे. भारत हा बांगलादेशाचा खरा मित्र आहे, असे हसिना म्हणाल्या.

चीलाहाटी-हल्दीबारी रेल्वे सेवा -

शेख हसिना आणि नरेंद्र मोदी यांनी चीलाहाटी-हल्दीबारी रेल्वे सेवाचा 55 वर्षानंतर पुन्हा प्रारंभ केला. तब्बल 55 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भारत आणि बांगलादेशादरम्यान रेल्वे सेवा सुरू झाली. 1965 च्या भारत-पाक युद्धावेळी ही रेल्वेसेवा खंडित झाली होती. चीलाहाटी-हल्दीबारी रेल्वे सेवामुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये बांगलादेशाशी जोडली जाणार आहेत.

हेही वाचा - उत्तर प्रदेशात तीन टप्प्यात पार पडणार कोरोना लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.