भूवनेश्वर - ओडिशात आज(रविवार) विमानाच मोठा अपघात टळला. भूवनेश्वरमधील बीजू पटनाईक विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी उड्डान घेतलेल्या विमानातून इंधनगळती होत असल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने आपातकालीन परिस्थितीत विमान खाली उतरवण्यात आले. विस्तरा विमान कंपनीची फ्लाईट यूके-785 हे विमान 96 प्रवाशांना घेवून दिल्लीला चालले होते.
सकाळी 11.40 च्या दरम्यान 96 प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डान केले होते. मात्र, टाकीतून इंधनगळती होत असल्याचे पायलटच्या लक्षात आल्यानंतर त्याने 'एमर्जन्सी लँडींग'ची परवानगी मागितली. अर्ध्या तासाच्या आत विमान पुन्हा खाली उतरविण्यात आले. दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान विमान सुखरूप उतरवण्यात आले. विमानातील बिघाड नीट करण्यात येत असून त्यास जास्त वेळ लागू शकतो असे, विमानतळ अधिकाऱयांनी सांगितले.