ETV Bharat / bharat

गुलाबी शहर जयपूरला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

बाकू (अझरबैझान) येथे ३० जून ते १० जुलैपर्यंत चालू असलेल्या जागतिक वारसा हक्क समितीच्या बैठकीत जयपूरसोबत जगातील अनेक इतर ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे.

जयपूर शहर १
author img

By

Published : Jul 6, 2019, 5:26 PM IST

नवी दिल्ली - गुलाबी शहर म्हणून ओळख असलेले राजस्थानमधील ऐतिहासिक शहर जयपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. युनेस्कोने वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या जयपूर शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.

युनेस्कोने ट्विट करत जयपूरचा जागतिक वारसा स्थळात समावेश केल्याची माहिती दिली. बाकू (अझरबैझान) येथे ३० जून ते १० जुलैपर्यंत चालू असलेल्या जागतिक वारसा हक्क समितीच्या बैठकीत जयपूरसोबत जगातील अनेक इतर ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे. जयपूर शहराची स्थापना सवाई जय सिंह दुसरा यांनी केली होती. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेले जयपूर शहर राजस्थानची राजधानी आहे.

narendra modi tweet
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करत आनंद व्यक्त केला. मोदींनी लिहिले, जयपूर शहर हे संस्कृती आणि शौर्याशी जोडलेले शहर आहे. मोहक आणि ऊर्जावान असलेले हे शहर जगभरातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. युनेस्कोने जयपूरचा जागतीक वारसा स्थळात समावेश केल्यामुळे आनंद आहे.

एका वरीष्ठ अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आयसीओएमओएसद्वारे २०१८ साली जयपूरची पाहणी करण्यात आली होती. जयपूरची पाहणी केल्यानंतर जयपूरला जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित करण्यात आले होते. यानंतर, बाकू येथे झालेल्या परिषदेत जयपूरला जागतीक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाले आहे.

Intro:Body:

ajay

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.