ETV Bharat / bharat

फिलिपाईन्सच्या राष्ट्रपतींनी मंचावर बोलवून ५ महिलांचे घेतले चुंबन, म्हणाले मी समलैंगिक नाही

दुर्तेते हे त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी अशा वागण्याने मात्र चांगलेच ट्रोल होत आहे. २०१८ साली फिलिपीनो समुदयाच्या एका बैठकीदरम्यानही त्यांनी अचानक एका महिलेचे चुंबन घेतले होते.

फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:22 PM IST

टोकियो - सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारे फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते यांनी आणखी एक नवीन प्रताप करून ठेवला आहे. जपान दौऱ्यावर असताना त्यांनी एकाच वेळी ५ महिलांना मंचावर बोलावून त्यांचे चुंबन घेतले. सुंदर महिलांमुळेच मी समलैंगिक होण्यापासून बचावलो, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. त्यावरून त्यांना समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

रोड्रिगो दुर्तेते हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानच्या टोकीयो शहरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुर्तेते यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अचानक काही महिलांना मंचावर बोलावून घेतले व चुंबन घेण्यास सांगितले. त्यामुळे या महिला आचंबित झाल्या. त्यापैकी पहिल्या महिलेने ओठावर की गालावर? असा प्रश्न विचारला असता, ओठांवर बोट ठेवत त्यांनी खुनावले. त्यांनुसार या महिलांनी त्यांचे चुंबन घेतले.

या सर्व महिलांनी आनंदात या ७४ वर्षीय राष्ट्रपतींचे चुंबन घेतले. यावेळी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क आश्रू आल्याचे दिसले. एका महिलेने चुंबन घेत असताना सेल्फीही खेचला. त्या सर्व महिलांनी दुर्तेते यांचे आभार मानले.
फिलिपाईन्स सरकारमधील एक नेते सेनेतोर अँटिनियो यांनी दुर्तेते यांना समलैंगीक असल्याची टीका केली होती. अँटिनोयो यांना फटकारत दुर्तेते यांनी सांगितले की, या सुंदर महिलांमुळेच मी संमलैंगिक होण्यापासून बचावलो.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीक केली जात आहे. दुर्तेते हे त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी अशा वागण्याने मात्र चांगलेच ट्रोल होत आहे. २०१८ साली फिलिपीनो समुदयाच्या एका बैठकीदरम्यानही त्यांनी अचानक एका महिलेचे चुंबन घेतले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.