ETV Bharat / bharat

नवी दिल्लीत डिझेलच्या दराचा उच्चांक, तर पेट्रोलने ओलांडला प्रतिलिटर 80 रुपयांचा टप्पा - डिझेल दरवाढ न्यूज

नवी दिल्लीतील स्टेट ऑईल मार्केटिंग कंपनींजच्या परिपत्रकानुसार दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 80 रुपये 13 पैसे तर डिझेलचा दर 80 रुपये 19 पैशांवर पोहोचला आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा दिल्लीत डिझेल महागले आहे. दिल्लीत डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे.

Petrol diesel rate hike news
नवी दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग
author img

By

Published : Jun 26, 2020, 11:30 AM IST

नवी दिल्ली- देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीमधील पेट्रोलच्या किमतीने 80 रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत डिझेलच्या किमतीनेही उच्चांक गाठला आहे. तेल कंपन्यांनी 7 जून पासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये दरवाढ सुरुच ठेवली आहे. यामुळे दोन वर्षानंतर दिल्लीतील पेट्रोलच्या किमतींनी 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलची किंमत प्रति लिटर 21 पैसे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 17 पैशांनी वाढली आहे.

पेट्रोल 79 रुपये 92 पैशांवरुन 80 रुपये 13 पैसे प्रति लिटर झाले आहेत. डिझेलचा दर 80 रुपये 19 पैशांवर गेला आहे. डिझेलची किंमत 80 रुपये 2 पैसे होती. संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, दिल्ली राज्याच्या विक्रीकरानुसार दिल्लीतील दर आणि देशातील इतर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत. मुंबईतील पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86 रुपये 19 पैसे असून डिझेलचा दर 78 रुपये 51 पैसे आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमतींनी 80 रुपयांचा टप्पा दोन वर्षांनी पार केला, तर डिझेलच्या किमती आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये दिल्लीत पेट्रोलच्या किमतींनी 80 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. डिझेलच्या किमती गेल्या 20 दिवसांपासून वाढत असून पेट्रोलच्या किमती सलग 19 दिवस वाढल्या आहेत.

7 जून पासून पेट्रोलचा दर प्रतिलिटर 8 रुपये 87 पैसे वाढला आहे. डिझेलचा दर 10 रुपये 8 पैसे वाढला आहे. दिल्लीमध्ये डिझेलचा दर पेट्रोल पेक्षा जास्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील राज्य सरकारने तेल विक्री वरील विक्री करात वाढ केल्यामुळे देशाच्या राजधानीत पेट्रोलची किंमत डिझेल पेक्षा कमी आहे. तर देशातील इतर राज्यात पेट्रोल महाग असून डिझेलची किंमत कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.