ETV Bharat / bharat

'भुवनेश्वरमध्ये लॉकडाऊन नियमांची एैशीतैशी' बाजारपेठेत सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन - भुवनेश्वरमध्ये लॉकडाऊन नियमांची एैशीतैशी

लॉकडाऊनमध्ये भुवनेश्वर येथील एका महाविद्यालयाच्या मैदानात भाजी मंडई भरवण्यात आली आहे. एकमेंकामध्ये आंतर राखत भाजीपाला खरेदी करण्याची परवानगी प्रशानसाने दिली आहे. मात्र, येथे भाजी-पाला खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

People defy social distancing norms in Bhubaneswar

author img

By

Published : Apr 4, 2020, 10:29 AM IST

भुवनेश्वर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भुवनेश्वर आणि भद्रक शहराला पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही शहरांमध्ये कर्फ्यूसदृष्य परिस्थिती असणार आहे. मात्र, येथील नागरिकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले नसून ते सर्सास बाहेर फिरताना पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी भाजी-पाला बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी करत सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन केले.

लॉकडाऊनमध्ये भुवनेश्वर येथील एका महाविद्यालयाच्या मैदानात भाजी मंडई भरवण्यात आली आहे. एकमेंकामध्ये आंतर राखत भाजीपाला खरेदी करण्याची परवानगी प्रशानसाने दिली आहे. मात्र, येथे भाजी-पाला खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ओडिशामध्ये 5 जण कोरोनाबाधित आहेत. भुवनेश्वरमधील पाचव्या कोरोनाच्या रुग्णाला स्थानिक माध्यमातून संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने शहरातील सूर्यनगर भागाला सील करून, शहरालाही लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत घराबाहेर फिरणे धोकदायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते. मात्र, लोक अद्यापही लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसून बाहेर फिरण्यास प्राधान्य देत आहेत. . सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सर्वच लोक 'लॉक डाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.