नवी दिल्ली- जम्मू काश्मिरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ही शिफारस राज्यसभेत मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. पीडीपीचे राज्यसभेचे खासदार नासिर अहमद आणि एम एम फयाज यांनी या निर्णयाविरोधात राज्यसभेत मोठा गोंधळ घातला.
पीडीपीच्या खासदारांनी स्वत:चे कपडे फाडून घेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संविधानाच्या प्रतही फाडण्याचा या खासदारांनी प्रयत्न केला. त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकया नायडू यांनी खासदारांना सभागृहातून बाहेर काढले.