जयपूर - राजस्थानातील कोटा जिल्ह्यात वैद्यकीय निष्काळजीपणाचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका 40 वर्षीय रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना कोटा शहरातील महाराव भीमसिंग रुग्णालयात घडली.
काय घडल ज्यामुळे रुग्णाला गमवावे लागले प्राण ?
विनोद नावाचा एक 40 वर्षीय व्यक्ती रुग्णालयातील अतिदक्षता विभाग उपचार घेत होता. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या आोरग्य कर्मचाऱ्याने कुलर लावण्यासाठी व्हेंन्टिलेटरचा प्लग काढला आणि तेथे कुलरचा प्लग लावला. व्हेंटिलेटरचा वीज प्रवाह बंद झाला मात्र, बॅटरीवर सुमारे अर्धा तास व्हेंन्टिलेटर चालले. बॅटरी संपल्यानंतर रुग्णाला अत्यावस्थ वाटू लागले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांना व्हेंटिलेटरचा वीज प्रवाह खंडीत झाल्याचे आढळून आले. मात्र तोपर्यंत रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्याने डॉक्टरांबरोबरच वाद घालायला सुरुवात केली. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे देशभरात अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागतात. कधी ऑक्सिजनऐवजी दुसराच कोणता वायू रुग्णाला दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर कधी ऑपरेशन करताना वैद्यकीय उपकरण शरीरात राहिल्याच्याही घटनाही घडल्या आहेत.