ETV Bharat / bharat

पारंपारिक टॅक्सी व्यवसायिकांचा 'गोवा माईल्स' विरोधात संप; मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी आवाहन - गोवा विधानसभा

'गोवा माईल्स' ही अॅपबेस्ड टॅक्सी सुविधा रद्द करावी या मागणीसाठी गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी आज (दि.२ ऑगस्ट) रोजी संप पुकारला आहे. टॅक्सीचालकांनी संप मागे घेऊन सरकारशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले आहे.

'गोवा माईल्स' ही अॅपबेस्ड टॅक्सी सुविधा रद्द करावी या मागणीसाठी गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी आज संप पुकारला आहे.
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:34 PM IST

पणजी - 'गोवा माईल्स' ही अॅपबेस्ड टॅक्सी सुविधा रद्द करावी या मागणीसाठी गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी आज (दि.२ ऑगस्ट) रोजी संप पुकारला आहे. टॅक्सीमालकांनी संप मागे घेऊन सरकारशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले आहे.

सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी टॅक्सी व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी सभागृहात चर्चा करण्यात आली. यावर उत्तर देताना, गोमंतक टॅक्सी व्यावसायिकांनी अॅपबेस्ड सेवा सुरू करवी. त्यालाही सरकारकडून पाठिंबा दिला जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सध्याची अॅपबेस्ड सेवा बंद करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर गोमंतक पारंपारिक टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्या टॅक्सी रस्त्यावर न उतरवण्याचा निश्चय करत संप पुकारला आहे.

'गोवा माईल्स' ही अॅपबेस्ड टॅक्सी सुविधा रद्द करावी या मागणीसाठी गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांनी आज संप पुकारला आहे.

संप पुकारल्याचे कळल्यावर, टॅक्सी ऑफरोड असल्याचे समजल्यानंतर त्यासंदर्भात माहिती घेण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांच्यावर कोणताही अन्याय करणार नाही. पारंपारिक टॅक्सी व्यवसायिकांचा गोवा 'माईल्स अॅप' ला विरोध असल्यास त्यांनी स्वतः अॅप तयार करावे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

यासाठी त्यांनी संप मागे घेऊन सरकारशी चर्चा करावी. अॅप तयार करण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याकडून आवश्यक ते सहकार्य पुरवले जाईल. संबंधित सेवा पर्यटक, गोवा आणि गोमंतकांच्या हिताची असून, भविष्यात व्यवसायाची हमी देणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच गोवा माईल्स विषयी बोलताना, हे अॅप गोवा पर्यटन खात्याच्या मालकीचे असून, त्याचा ऑपरेटर हा कंत्राटदार आहे. तसेच या अॅपबाबत सर्व माहिती पर्यटन खात्याकडे आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, उत्तर गोवा टुरिस्ट टॅक्सी संघटना अध्यक्ष वासूदेव आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता, आज आम्ही टॅक्सी रस्त्यावर उतरवल्या नाहीत. यानंतर पुढे काय निर्णय घ्यावा याविषयी सर्व संघटना़ची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.

Intro:पणजी : 'गोवा माईल्स' ही अँपबेस्ड टँक्सी सुविधा रद्द करावी या मागणीसाठी गोव्यातील पारंपरिक टँक्सी व्यावसायिकांनी आज टँक्सीसेवा बंद करत संप पुकारला आहे. तर त्यांनी आपला संप मागे घेत सरकारशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले आहे.

Body:गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून गोमंतकियांनी टँक्सी व्यावसायिकांच्या मागणीचा विचार करण्यासाठी बुधवारी सभागृहात चर्चा करण्यात आली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीय टँक्सी व्यावसायिकांनीही अँपबेस्ड सेवा सुरू करवी. त्यालाही सरकार तेवढेच प्राधान्य देईल, जसे गोवा माईल्स ला दिले जाते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अँपबेस्ड टँक्सीसेवा बंद करणार नाही, असे सांगितले होते.
त्यानंतर आज (शुक्रवारी) गोमंतकिय पारंपरिक टँक्सी व्यावसायिकांनी आपल्या टँक्सी ररस्त्यावर न उतरण्याचा निश्चित करत संप पुकारला आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आज टँक्सी ऑफरोड असल्याचे समजल्यानंतर त्याचा माहिती घेण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांच्यावर कोणताही अन्याय करणार नाही. त्यांना जर गोवा माईल्स अँप नको असेल तय त्यांनी स्वतः अँप तयार करावा. यासाठी त्यांनी संप मागे घेत सरकारशी चर्चा करावी. अँप तयार करण्यासाठी आपला ऑपरेटर आणाला त्यांना तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याकडून आवश्यक सहकार्य केले जाईल. तसेच त्यांच्या अँपला तेवढेच प्रोत्साहन दिले जाईल. ही सेवा पर्यटक, गोवा आणि गोमंतकियांच्या हिताची आहे. तसेच भविष्यात व्यवसायाची हमी देणारी आहे.
तर गोवा माईल्स विषयी बोलता मुख्यमंत्री म्हणाले, हे अँप ही गोवा पर्यटन खात्याच्या मालकीचे आहे. त्याचा ऑपरेटर हा कंत्राटदार आहे. तसेच या अँप विषयीची सर्व माहिती पर्यटन खात्याकडे आहे.
दरम्यान, उत्तर गोवा टुरिस्ट टँक्सी संघटना अध्यक्ष वासूदेव आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आज आम्ही आमच्या टँक्सी ररस्त्यावर उतरवलेल्या नाहीत. यानंतर पुढे काय निर्णय घ्यावा याविषयी सर्व संघटना़ची बैकठ घेऊन निर्णय घेतला जाईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.