ETV Bharat / bharat

गोवा विधानसभा पोटनिवडणूक : भाजप ३ ठिकाणी तर काँग्रेस एका जागेवर विजयी - Babush Moncerate

म्हापसा, मांद्रे, शिरोडा आणि पणजी हे मतदारसंघ विविध कारणांमुळे रिक्त झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

विजयाचा जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते
author img

By

Published : May 23, 2019, 8:36 PM IST

Updated : May 23, 2019, 9:50 PM IST

पणजी - गोवा विधानसभेच्या ४ पोटनिवडणुकांमध्ये भाजप ३ ठिकाणी तर काँग्रेस १ जागेवर विजय मिळवला आहे. म्हापसा, मांद्रे, शिरोडा आणि पणजी हे मतदारसंघ विविध कारणांमुळे रिक्त झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा मतदासंघात लोकसभेबरोबर तर पणजी विधानसभा मतदारसंघात वेगळी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निकालावार गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले होते.

पोटनिवडणुकीत विजयी झालेले उमेदवार प्रतिक्रिया देताना

पणजी विधानसभेची जागा जिंकण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने २५ वर्षांत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. १९९४ पासून मनोहर पर्रीकर भाजपच्या तिकिटावर निवडून येत असत. त्यांच्या निधनाने गोवा विधानसभेची ही जागा रिक्त झाली होती. आज झालेल्या मतमोजणीत या मतदारसंघात काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले आहेत. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असे असले तरी उत्तर गोव्यातील म्हापसा आणि मांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त केले आहे. म्हापसात जोशूआ डिसोझा तर मांद्रेतून दयानंद सोपटे निवडून आले. तर शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर ६६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार दिलीप ढवळीकर यांचा पराभव केला आहे.

मांद्रे मतदार संघात काँग्रेसमधून भाजपत आलेले दायानंद सोपटे विजयी झाले आहेत. म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी त्यांचे चिरंजीव जोशूआ यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले होते.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दयानंद सोपटे म्हणाले की, हा मोठा विजय आहे. आमदारकीचा राजीनामा देत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची जोखीम घेतली होती. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजप उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा 7 हजार 500 पराभव केला होता. तर आजच्या पोटनिवडणुकीत पार्सेकर यांचाचा पुन्हा पराभव केला आहे. कारण अपक्षाला मिळालेली सर्व मते ही त्यांच्या जवळच्या लोकांची आहेत. पक्ष एकनिष्ठतेच्या गोष्टी करणाऱ्यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ नसल्याचे दाखवून दिले. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना काय म्हणावे असा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यात लोकसभेची १ आणि विधानसभेची १ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या ३ जागा आणि लोकसभेची १ जागा जिंकण्यात आम्ही अपयशी ठरल्यामुळे याची जबाबदारी मी स्विकारतो, असे ते म्हणाले.

Intro:पणजी : गोवा विधानसभेच्या चार पोटनिवडणुकांमध्ये भाजप तीन ठिकाणी तर काँग्रेस एका जागेवर पुढे असून विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.

Body:म्हापसा, मांद्रे, शिरोडा आणि पणजी हे मतदारसंघ विविध कारणांमुळे रिक्त झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा मतदासंघात लोकसभेबरोबर तर पणजी विधानसभा मतदारसंघात वेगळी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निकालावार गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले होते.
आज झालेल्या मतमोजणीत भाजपने तीन तर काँग्रेसने एका ठिकाणी विजय प्राप्त करण्याच्या मार्गावर आहेत. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
मांद्रे मतदार संघात काँग्रेसमधून भाजपात आलेले दायानंद सोपटे विजयी ठरले आहेत. म्हापसाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे रिक जागी त्यांचे चिरंजीव जोशूआ यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले होते. तेही आघाडीवर आहेत. भाजप आणि मगोने प्रतिष्ठेचा बनवलेल्या शिरोडा मतदारसंघात भाजपचे सुभाष शिरोडकर विजयाच्या मार्गावर आहे.
तर काँग्रेसल एकमेव पणजी मतदारसंघात यश लाभताना दिसत आहे. मागील 25 वर्षे भाजपकडे असलेली ही जागा पोटनिवडणुकीतील उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्यामुळे विजयाच्या मार्गावर आहे.
सर्वच विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जवळजवळ तयार असून त्यांची घोषण होणे बाकी आहे.

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 9:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.