वॉशिंगटन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्वप्नातील नया पाकिस्तान आर्थिक संकटामध्ये अ़डकला आहे. तसेच देशाच्या विदेश आणि सुरक्षा नीतीवर पाकिस्तानच्या लष्कराचे वर्चस्व राहीले आहे. इम्रान खान लष्कराच्या हातातील बाहुले बनले आहे, असे अमेरीका काँग्रेसच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा- पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी, काश्मीर मुद्दाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न
नया पाकिस्तान घडवण्यासाठी तरुणांनी आणि मध्यमवर्गाने इम्रान खान यांना निवडून दिले. मात्र, लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. आर्थिक संकटामुळे लोकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. 'पाकिस्तानची देशांतर्गत राजकीय व्यवस्था' असे या अहवालाचे नाव आहे. हा अहवाल 'काँग्रेस रिसर्च सर्विसेस' ने तयार केला आहे. माजी प्रसिद्ध क्रिकेटपट्टू आणि धनाढ्य असलेले इम्रान खान कायमच अमेरीकेचे टीकाकार राहिले आहेत. तसेच काही लोक त्यांना मुस्लिम दहशतवाद्यांना सहानभूती देणारे म्हणून ओळखतात, असे या अहवालात म्हणले आहे.
हेही वाचा- पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बरळले, 'नरेंद्र मोदींची काश्मीर मुद्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही'
२०१८ साली इम्रान खान यांची सत्ता लष्कराच्या हस्तक्षेपामुळेच आली. २०१८ च्या निवडणूकीआधी आणि त्यानंतरही लष्कराची पाकिस्तानच्या राजनितीवर पकड राहीली आहे. नवाज शरिफ यांना सत्तेवरून हटवणे हा पाकिस्तानच्या लष्कराचा मुख्य उद्देश होता, असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. लष्कर आणि न्यायालयाच्या मदतीनेच इम्राम खान यांच्या तेहरिक -ए- इंन्साफ या पक्षाला समर्थन मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा- जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार देणार ५० हजार नोकऱ्या