जम्मू - पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या मतराई आणि चंदवा या खेड्यांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमा सुरक्षा दलाने देखील रात्री पावणेदोनच्या सुमारास गोळीबार करून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार जवळपास ३ वाजण्याच्या सुमारास बंद झाला. मात्र, या गोळीबारात भारताची कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्वतःच्या सुरक्षेसाठी तेथील रहिवाशांनी भूमिगत बंकरमध्ये रात्र घालवली, असेही सांगितले जात आहे.