नवी दिल्ली - भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाल्याचे दिसतेय. जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती सैन्यातील सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आपतकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर सीमेवर मोठा गोळीबार करण्यात आला होता. याचा फायदा घेत काही दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सैन्यातील सुत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्याने पाकिस्तान संतापला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून काही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.