इस्लामपूर - महत्त्वाकांक्षी अशा करतारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानने, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रित करण्याचे ठरवले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ही माहिती दिली होती. त्यासाठी मनमोहन सिंग यांना रीतसर आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता, मनमोहन सिंग हे आमंत्रण स्वीकारणार नसल्याचे कॉंग्रेस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
-
Congress Sources: Former Prime Minister Manmohan Singh will not accept Pakistan's invitation to the opening of #KartarpurCorridor (File pic) pic.twitter.com/ZYRodq5GPK
— ANI (@ANI) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress Sources: Former Prime Minister Manmohan Singh will not accept Pakistan's invitation to the opening of #KartarpurCorridor (File pic) pic.twitter.com/ZYRodq5GPK
— ANI (@ANI) September 30, 2019Congress Sources: Former Prime Minister Manmohan Singh will not accept Pakistan's invitation to the opening of #KartarpurCorridor (File pic) pic.twitter.com/ZYRodq5GPK
— ANI (@ANI) September 30, 2019
शिखांच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे, पाकिस्तानच्या करतारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारा. भारतातील शीख भाविकांना तेथे जाता यावे यासाठी करतारपूर कॉरिडॉर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कॉरिडोअरचे उद्घाटन पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.
-
Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi: We would like to extend an invitation to former Indian PM Manmohan Singh for the inauguration function of Kartarpur Corridor. He also represents the Sikh community. We will also send him a formal invitation. pic.twitter.com/ehcjBQxp8L
— ANI (@ANI) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi: We would like to extend an invitation to former Indian PM Manmohan Singh for the inauguration function of Kartarpur Corridor. He also represents the Sikh community. We will also send him a formal invitation. pic.twitter.com/ehcjBQxp8L
— ANI (@ANI) September 30, 2019Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi: We would like to extend an invitation to former Indian PM Manmohan Singh for the inauguration function of Kartarpur Corridor. He also represents the Sikh community. We will also send him a formal invitation. pic.twitter.com/ehcjBQxp8L
— ANI (@ANI) September 30, 2019
मोदी सोडून मनमोहन का..?
दरम्यान, भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डावलून, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना का निमंत्रण दिले? याबाबत सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कलम ३७०च्या निर्णयामुळे असे केले गेले असल्याची शक्यतादेखील नेटीझन्स व्यक्त करत आहेत. मनमोहन सिंग स्वतः शीख असल्याने ते शीख धर्मीयांचे प्रतिनिधित्व करतात असे शाह मेहमूद कुरेशी यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा : भाजपने दिले भाजीवाल्याच्या मुलाला विधानसभेचे तिकीट