इस्लामाबाद - भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने तत्काळ संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. भारताला योग्य वेळी त्यांच्याच धर्तीवर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही पाकने दिली आहे.
![पाकिस्तान पंतप्रधानांची बैठक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/2558462_93_86d47ff8-7bbe-47a3-95c8-ffa650669ca8.png)
पाक साखर झोपेत असतानाच भारताने पाकवर हवाई हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडालेली दिसते. भारताच्या वतीने कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही, असे पाक म्हणत असला तरी पाकच्या पंतप्रधानांनी तत्काळ लष्कर प्रमुखांसोबत बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश होता.
आपण जनतेची दिशाभूल करणार नाही. मात्र, पाकिस्तानवर युद्धाचे सावट आहेत. त्यामुळे सीमाक्षेत्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारताला धमकी दिली आहे. तुम्ही पाकिस्तानला चेतवले. योग्य वेळी तुमच्याच जागेवर चोख प्रत्युत्तर दिले जाणार, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी संयुक्त संसदीय सत्र बोलावले आहे. यामध्ये पाकिस्तानचे विरोधी पक्ष सरकार सोबत बसून हल्ल्यावर मंथन करतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. संपूर्ण देश यावेळी एकसंघ आहे. आमचे राजकीय दृष्टीकोण वेगळे असले तरी आम्ही देशाच्या नात्याने एक आहोत. देशासाठी काय पाऊल उचलावे हे आम्ही संयुक्त रित्या बसून ठरवणार, असे पाकिस्ताप पिपल्स पक्षाचे नेते खुर्शीद शहा यांनी म्हटले आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)