नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त येत्या ९ नोव्हेंबरला कर्तारपूर मार्ग खुला करत असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. ही माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी दिली आहे.
-
Pakistan Foreign Minister, on Pak's Capital TV, on Kartarpur Corridor: I had invited former PM of India Manmohan Singh. I'm thankful to him, he wrote me a letter & said, 'I'll come but not as chief guest but an ordinary man.' We'll welcome him even if he comes as an ordinary man. pic.twitter.com/Kbx3ePhX2U
— ANI (@ANI) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan Foreign Minister, on Pak's Capital TV, on Kartarpur Corridor: I had invited former PM of India Manmohan Singh. I'm thankful to him, he wrote me a letter & said, 'I'll come but not as chief guest but an ordinary man.' We'll welcome him even if he comes as an ordinary man. pic.twitter.com/Kbx3ePhX2U
— ANI (@ANI) October 19, 2019Pakistan Foreign Minister, on Pak's Capital TV, on Kartarpur Corridor: I had invited former PM of India Manmohan Singh. I'm thankful to him, he wrote me a letter & said, 'I'll come but not as chief guest but an ordinary man.' We'll welcome him even if he comes as an ordinary man. pic.twitter.com/Kbx3ePhX2U
— ANI (@ANI) October 19, 2019
पाकिस्तान कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन येत्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. यासाठी आम्ही प्रमुख पाहूणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आमंत्रन दिले. मनमोहन सिंग यांनी आमंत्रन मान्य केले असून ते एक प्रमुख पाहुण्याच्या रुपात नाही. तर एका सामान्य माणूस म्हणून कर्तारपूर मार्गीकेच्या उद्घाटन समांरभात येतील, असे कुरैशी यांनी सांगितले आहे. दरम्यान मनमोहन सिंग यांनी या प्रकारचे कुठलेच आमंत्रण स्वीकारलं नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ८ नोव्हेंबर कर्तारपूर मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. दररोज जवळपास पाच हजार भाविक कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेऊ शकतात. १५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात आहे.