ETV Bharat / bharat

चोवीस तासांच्या आत पाकिस्तानकडून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी - केरनी सेक्टर गोळीबार

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरातील पूंछ जिह्यामध्ये आज (मंगळवारी) सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तसेच काल रात्री पाकिस्तानने कठुआ जिल्ह्यामध्ये केलेल्या गोळीबारामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 1, 2019, 10:18 AM IST

Updated : Oct 1, 2019, 2:48 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरातील पूंछ जिह्यामध्ये आज (मंगळवारी) सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तसेच काल रात्री पाकिस्तानने कठुआ जिल्ह्यामध्ये केलेल्या गोळीबारामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. गेल्या चोवीस तासांत पाकिस्तानने दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

हेही वाचा - VIDEO : पांढरा ध्वज फडकावत पाकिस्तान सैन्याने जवानांचे मृतदेह नेले माघारी

हरीनगर भागातील मनवारी चौकीवर तैनात असलेला बीएसएफचा एक जवान काल रात्री पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली. तसेच आज सकाळी पुंछ जिल्ह्याच्या शहारपूर आणि केरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire in Shahpur & Kirni sectors of Poonch district today at about 0745 hours . Indian Army is retaliating.

    — ANI (@ANI) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - १५ ऑगस्ट : कुरापतखोर पाकिस्तानसह चीनला भारताने शिकवला धडा; महत्त्वाच्या ५ लढायांचा इतिहास

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे सीमेवरील गावांचे नुकसान झाले आहे. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानचे अनेक जवान ठार झाले असून सीमेवरील चौक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये दशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करण्यात येत आहे. त्यामुळे सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • Border Security Force (BSF): One BSF jawan received minor injuries in ceasefire violation by Pakistan at Manyari post of Hiranagar in Kathua district (Jammu) last night. pic.twitter.com/OHrMzM7KgP

Intro:Body:

nat. marathi

Conclusion:
Last Updated : Oct 1, 2019, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.