ETV Bharat / bharat

पाकिस्तानात कोरोनाचा कहर, एकाच दिवसात 100 हून अधिक जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 9, 2020, 6:37 PM IST

सोमवारी पाकिस्तानमध्ये 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 2 हजार 172 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात 35 हजार 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

pk corona
पाकिस्तानात कोरोनाचा कहर

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात १०० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे, तर, देशातील 1 लाख 8 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने मंगळवारी दिली.

सोमवारी पाकिस्तानमध्ये 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 2 हजार 172 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात 35 हजार 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मागील 24 तासात पाकिस्तानमध्ये 4 हजार 646 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 लाख 8 हजार 317 वर पोहचला आहे.

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 40 हजार 819, सिंधमध्ये 39 हजार 555, खैबर-पख्तूनख्वामध्ये 14 हजार 6, बलुचिस्तानात 6 हजार 788, इस्लामाबादेत 5 हजार 785, गिलगिट-बाल्टिस्तान 952 आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये 412 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.