ETV Bharat / bharat

VIDEO : पांढरा ध्वज फडकावत पाकिस्तान सैन्याने जवानांचे मृतदेह नेले माघारी - पाकिस्तान लष्कर व्हिडिओ

जवानांचे मृतदेह नेता यावे म्हणून पाकिस्तानने गोळीबाराची तीव्रता आणखी वाढवली होती. मात्र, तरीही मृतदेह नेता न आल्याने पांढरा ध्वज फडकावत मृतदेह नेले.

पाकिस्तानी सैन्य
author img

By

Published : Sep 14, 2019, 3:08 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तान सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मात्र, यामुळे पाकिस्तानचेच नुकसान होत आहे. पाकने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावेळी भारतीय लष्कराने त्यांच्या २ जवानांचा खात्मा केला. त्यानंतर मात्र भारताकडून सतत गोळीबार सुरू असल्याने त्यांच्या सैन्याला मृतदेह माघारी नेता येत नव्हते. त्यामुळे काल(शुक्रवारी) पाकिस्तानी सैनिक पांढरे ध्वज दाखवत भारतीय सीमेमध्ये आले आणि जवानांचे मृतदेह घेऊन गेले.

पाक सैन्य जवानांचे मृतदेह नेताना

पांढरा ध्वज फडकावण्यास भारतीय सैन्याने पाकिस्तानला भाग पाडले. १० आणि ११ सप्टेंबरला पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या गोळीबारात पाकिस्तान सैन्यातील शिपाई गुलाम रसुल याचा मृत्यू झाला. रसुल हा पंजाब प्रांतातील बहावलनगर येथील आहे. गोळीबार सुरू असल्याने पाकिस्तानी सैन्याला मृतदेह माघारी नेता येत नव्हता. जवानाचा मृतदेह नेता यावा म्हणून पाकिस्तानने गोळीबाराची तीव्रता आणखी वाढवली.

गोळीबार सुरू असताना मृतदेह माघारी नेण्याच्या प्रयत्नात त्यांचा आणखी एक जवान ठार झाला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला जवानांचे मृतदेह नेण्यासाठी पांढरे निशाण दाखवत यावे लागले. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या या मागणीचा सन्मान केला. मृतदेह नेत असताना भारतीय सैन्याने गोळीबार केला नाही.

याआधीही ३० आणि ३१ जुलैला घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तानचे ७ ते ८ जवानांचा खात्मा झाला होता. त्या जवानांचे मृतदेह तसेच सीमेवर पडून होते. भारतीय सैन्याने मृतदेह माघारी नेण्याचं आवाहन केले होते, मात्र, पाकिस्तानने प्रतिसाद दिला नाही.

Intro:Body:TumakuruConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.