नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी स्थलांतरीत कामगारांवर भाष्य केले. कोरोना संकटामुळे गरीब आणि मजुरांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या व्यथा शब्दात सांगता येणार नाहीत, असे मोदी म्हणाले. कोरोनाचा सर्वांत जास्त त्रास गरीब लोकांनाच सहन करावा लागल्याचे ते म्हणाले.
हळूहळू उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि मास्क घालणे गरजेचे आहे. सर्व नागरिक कोरोनाविरोधात मजबुतीने लढा देत आहेत. भारताची इतर देशांशी तुलना केल्यास आपल्याकडे कोरोनाचा वेगाने फैलाव झाला नाही. तसेच कोरोना मृत्यूचा दर आपल्या देशात फार कमी आहे, असे मोदींनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टाळेबंदी 30 जूनपर्यंत वाढविली आहे. देशभरात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कंटेन्टमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत.