मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम' ला संबोधित करणार आहेत. त्याआधी त्यांनी भारतीय उद्योजकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'इंडो रशिया इनोव्हेशन ब्रिज'चे उद्धाटन केले. या उपक्रमाद्वारे नव उद्योगांना चालना मिळणार आहे.
-
Russia: Prime Minister Narendra Modi visits India Business Pavilion at Eastern Economic Forum and inaugurates Indo-Russian Innovation Bridge, in Vladivostok. pic.twitter.com/puKyr5baJU
— ANI (@ANI) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Russia: Prime Minister Narendra Modi visits India Business Pavilion at Eastern Economic Forum and inaugurates Indo-Russian Innovation Bridge, in Vladivostok. pic.twitter.com/puKyr5baJU
— ANI (@ANI) September 5, 2019Russia: Prime Minister Narendra Modi visits India Business Pavilion at Eastern Economic Forum and inaugurates Indo-Russian Innovation Bridge, in Vladivostok. pic.twitter.com/puKyr5baJU
— ANI (@ANI) September 5, 2019
हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम'
रशियामधील भारतीय उद्योजकांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी यावेळी चर्चा झाली. यामुळे स्टार्टअप उद्योगांना उभारी मिळण्यास सहाय्य होणार आहे. दोन्ही देशांमध्ये आधीच मैत्रिपूर्ण संबध असून मोदींच्या या दौऱ्यामध्ये २५ करारांवर सह्या करण्यात आल्या.
हेही वाचा - द्विपक्षीय शिखर बैठकीपूर्वी मोदी-पुतीन यांची गळाभेट
इस्टर्न इकॉनॉमिक फोरम बैठकीपूर्वी मोदींनी जपान, मलेशिया आणि मंगोलिया देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद आणि मोदीमध्ये विवादित मुस्लीम धर्मगुरु झाकिर नाईकच्या प्रत्यर्पणाविषयी चर्चा झाली.
मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या मध्येही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. लवकरच शिंजो अॅबे भारत दौऱ्यावर येणार आहेत. याविषयीही चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.