ETV Bharat / bharat

काय आहे आयएनएक्स प्रकरण.. आत्तापर्यंतच्या महत्वपूर्ण घडामोडी - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम

आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांना ताब्यात घेतलं आहे.

आयएनएक्स प्रकरण
author img

By

Published : Aug 21, 2019, 11:57 PM IST

नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांना ताब्यात घेतलं आहे. पी. चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाहुया आत्तापर्यंत काय झाल्या घडामोडी

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात ३०५ कोटीं रुपयांचा भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत. आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करत आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

१) याप्रकरणी सीबीआयने १५ मे २०१७ रोजी चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा किर्ती चिदंबरम यांना अटकही करण्यात आली होती. परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळाच्या (एफआयपीबी) मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

२) 16 जून 2017 ला किर्ती चिदबंरम यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आले.

३) 14 अगस्त 2017 ला सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर रोक लावली. त्यानंतर लुक आउट नोटीस जारी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

४) 22 सप्टेबंर 2017 ला सीबीआईने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की कार्ती चिदंबरम यांच्यावर परदेशात जाण्यास बंधन घालावे. कारण चिदंबरम परदेशातील आपली बँक खाती बंद करण्याची शक्यता होती.

५) 9 ऑक्टोबंर 2017 : पी. चिदंबरम यांनी भाजपवर आरोप केला की, ते राजकीय हेतूने बदला घेण्यासाठी हे कृत्य करत आहेत.
६) 16 फेब्रुवारी 2018 : किर्ती चिदंबरम यांचे सीए एस भास्कर यांना चुकीच्या मार्गाने पैसे मिळवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
७) 28 फरवरी 2018: चेन्नई विमानतळावर किर्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना दिल्लीत आणण्यात आले. दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

८) 6 मार्च २०१८ : विशेष न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
९) 23 मार्च 2018 : कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला.
१०) 12 ऑक्टोबर २०१८ : कार्ती चिदंबरम यांची ५४ कोटींची संपत्ती जप्त केली.

११) २२ फेब्रुवारी २०१९: पी. चिदंबरम यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे केंद्र सरकारने सीबीआयला निर्देश दिले.
१२) 1 ऑगस्ट २०१९ : ईडीने दिल्लीतील घर खाली करण्याबाबत कार्ती चिदंबरम यांना नोटीस पाठवली होती. त्याला कार्ती यांनी आव्हान दिले होते.

13) 20 ऑगस्ट २०१९ : दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांची याचिका फेटाळली.
१४) २१ ऑगस्ट २०१९ : आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.