हैदराबाद (तेलंगणा) - एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रसरकारवर निशान साधत, गृह मंत्रालय केवळ मार्गदर्शक सूचना देत असून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पैसे देत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच संविधानानुसार राज्य सरकारलाच नागरिकांच्या सूचना, आरोग्य आणि कायदा व सुव्यस्थेची नीट अंमलबजावणी करण्याचे अधिकार असल्याचेही ओवेसी म्हणाले. केद्रीय गृह मंत्रालयाकडून अलीकडे एक नवीन मार्गदर्शक सूचना प्रदर्शीत करण्यात आली. त्यावर ओवेसी बोलत होते.
ओवेसी म्हणाले, 1952 ला संविधानाने स्पष्ट केले होती की, नागरिकांना द्यावयाच्या सूचना, त्यांचे आरोग्य आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकारला अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, सद्यस्थितीत गृहमंत्री अमित शाह हे राज्याचे लोकनियुक्त सरकारला आदेश देत आहेत. शाह यांना कुणी अधिकार दिले? तसेच विविध राज्यांकडून आर्थिक मदत न करता चांगल्या कामाची ते अपेक्षा करत आहेत. असा प्रश्नही ओवेसींनी शाहांना विचारला आहे.