भोपाळ- मध्य प्रदेशातील बहुजन समाज पार्टीचे नेते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. शिवपुरी मधील करेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले प्रागी लाल जाटव यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट घेतल्यानंतर बसपा नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.
काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
22 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मध्य प्रदेश राज्यातील सत्ता गमवावी लागली होती.
पोटनिवडणूक होणाऱ्या 22 जागांवर कॉंग्रेस आणि भाजपला विजयी होण्यासाठी जोरदार ताकद लावावी लागणार आहे.