ETV Bharat / bharat

कुल्लू-मनालीतील हिमवर्षावात अडकले ५०० पर्यटक; बचावकार्य सुरू

कुल्लूमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणचे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच बर्फवृष्टीमुळे महामार्गावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनालीचे उपविभागीय अधिकारी रमन घरसंगी यांनी दिली.

KULLU
कुल्लू मनालीतील हिमवर्षावत अडकले ५०० पर्यटक
author img

By

Published : Jan 3, 2021, 8:08 AM IST

Updated : Jan 3, 2021, 8:22 AM IST

शिमला - हिमाचल प्रदेशात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील शेकडो पर्यटक कुल्लू मनालीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या हिमवर्षावामुळे जवळपास ५०० पर्यटक अडकल्याची घटना घडली आहे. कुल्लू जिल्ह्यातील मनालीच्या अटल बोगद्याच्या दक्षिण भागात हे पर्यटक अडकले आहेत. या पर्यटकांची सुखरूपपणे सुटका करण्याचे काम सुरू आहे.

बचाव पथक घटनास्थळी दाखल-

कुल्लूमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणचे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे अटल बोगदा ते सोलंग नाला या महार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर अडकून पडलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच बर्फवृष्टीमुळे महामार्गावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनालीचे उपविभागीय अधिकारी रमन घरसंगी यांनी दिली.

कुल्लू जिल्ह्यात होणाऱ्या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र दोन दिवसांपासून होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जिल्ह्यातील अटल बोगदा ते सोलंग नाला मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यातच पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी आलेले ५०० पर्यटक अडकून पडले आहेत.

बचावकार्य अद्याप सुरूच

या घटनेनंतर कुल्लू प्रशासनाने शनिवारी रात्री ८ वाजता तातडीने बचाव पथके रवाना केली आहेत. या पथकामध्ये 20 (4x4) रेस्क्यू वाहनांचा समावेश आहे. तसेच या पथकाला बर्फात अडकलेल्यांना योग्य त्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहेत. या पथकासह एक ४८ प्रवासी क्षमतेची बस आणि काही प्रवासी कारही पर्यटकांना सुरक्षक्षित स्थळी हलवण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. बचाव कार्य अद्यापही सुरूच असल्याची माहिती घरसंगी यांनी दिली.

हवामान विभागाने बुधवारीच हिमाचल प्रदेशमध्ये अतिहिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तवला होता. ५ जानेवारीला मध्यम ते उंच शिखरांवर हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Last Updated : Jan 3, 2021, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.