गुवाहटी - भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. आसाममध्ये विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या 29 दिवसांमध्ये पोलिसांनी तब्बल 2 हजार 50 लोकांना अटक केले असून तब्बल 1 कोटी एवढा दंड वसूल केला आहे.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 17 हजार 268 गाड्या, 25 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात फेक बातमी आणि सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी 85 गुन्ह्यांची नोंद झाली असून 46 जणांना अफवा पसरवल्याप्रकरणी अटक केली आहे.
देशातील काही भागांमध्ये नागरिक नियमांचं उल्लंघन करत रस्त्यावर येताना दिसत आहेत. अशा लोकांवर नियंत्रण ठेवताना पोलिस यंत्रणेवर ताण पडताना दिसत आहे. संचारबंदी काळात तरी नागरिकांनी शिस्त पाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यांतील 21 ठिकाणे सील करण्यात आली आहेत. तर राज्यात आतापर्यंत 35 कोरोनाबाधित आढळले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण उपाचारानंतर बरे झाले आहेत.