गुवाहाटी - मुसळधार पावसामुळे आसाममधील तीन जिल्ह्यात पसरलेल्या बराक दरीच्या खोऱ्यात भूस्सखलनाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील 20 मृतांपैकी 6 जण हे करीमगंज जिल्ह्यातील आहेत. तर इतर हे कछर आणि हैलकंडी जिल्ह्यातील आहेत.
मुसळधार पावसामुळे आसामला पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जिल्ह्यातील लाखो लोक हे पूरग्रस्त झाले आहेत. आसाममध्ये 2 हजार 678 हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे. तर 44 हजार 331 जनावरे आणि 9 हजार 350 कोंबड्या हे पुरात नष्ट झाले आहे. चक्रीवादळाच्या आगमनानंतर 20 एप्रिलपासून आसाम आणि मेघालयाच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे.