हैदराबाद – युनिसेफने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात धक्कादायक बाब समोर आणली आहे. २०१८ पासून तब्बल एक कोटी ३० लाख बालकांना कोणत्याही प्रकारची लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा बालकांवर जीवघेण्या आजारांचे संकट उभे राहिले आहे.
कोरोना व्हायरस (कोव्हिड-19) मुळे संपूर्ण जग थांबले आहे. या पार्श्वभूमीवर यूनिसेफने इशारा दिला आहे, की जगातील १९ देशातील व्यवहार कोरोनामुळे ठप्प पडले आहेत. जगभर पसरलेल्या कोरोना महामारीमुळे कोट्यवधी बालक डिप्थीरिया आणि पोलिओ सारख्या जीवनरक्षक लसीपासून वंचित राहण्याचे संकट आहे.
संयुक्त राष्ट्र बाल कोष'ने म्हटले आहे, की कोव्हिड-19 महामारी येण्यापूर्वी एक वर्षाहून कमी वयाचे जवळपास दोन कोटी बालक जीवन रक्षक लसींपासून वंचित होते. यूनिसेफने सध्याच्या परिस्थितीवर इशारा दिला आहे, की 2020 मध्ये व यापुढच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. संयुक्त राष्ट्र बालक कोषने म्हटले आहे, की 2018 मध्ये 1.3 कोटी बालक लसीकरणापासून वंचित राहिले होते. विश्व लसीकरण सप्ताह २०२० सत्राच्या सुरुवातीला यूनिसेफने भीती व्यक्त केली आहे, लाखो बालक डिप्थीरिया आणि पोलिओसारख्या जीवन रक्षक लसींपासून वंचित राहू शकतात.
कोरोना व्हायरसचा कहर देशाबरोबरच संपूर्ण जगावर दिसू लागला आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी रुग्णालये कमी पडत आहेत. काही देशांमध्ये जहाज आणि रेल्वे बोगींमध्ये कोरोना संक्रमितांवर उपचार केले जात आहेत. अशावेळी अन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशावेळी लसीकरण मोहीमही ठप्प पडली आहे. याच समस्यकडे यूनिसेफने जगाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान भारतात लसीकरण मोहीम सुरू असून अनेक रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू केल्या आहेत.